2.6 KiB
2.6 KiB
असे लिहिले आहे
व्याख्या:
"असे लिहिले आहे" किंवा "काय लिहिले आहे" हे वाक्यांश नवीन करारामध्ये वारंवार आढळतात आणि सहसा ह्यांचा संदर्भ आज्ञा किंवा भविष्यवाण्या ह्याच्याशी येतो, ज्या इब्री वचनांमध्ये लिहिलेल्या होत्या.
- काहीवेळा "असे लिहिले आहे" ह्याचा अर्थ मोशेच्या नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे असा होतो.
- इतर वेळी, जुन्या करारामध्ये संदेष्ट्यांनी जे लिहिले, त्यापैकी एक उद्धरण आहे.
- ह्याचे भाषांतर, "मोशेच्या नियमांमध्ये असे लिहिले आहे" किंवा "फार पूर्वी संदेष्ट्यांनी असे लहिले होते" किंवा "देवाच्या नियमशास्त्रामध्ये काय सांगितले आहे, ते मोशेने फार पूर्वी लिहून ठेवले होते.
- "असे लिहिले आहे" हे तसेच ठेवण्याचा अजून एक पर्याय म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, हे स्पष्ट करण्यासाठी एक तळटीप देणे.
(हे सुद्धा पहा: आज्ञा, नियमशास्त्र, संदेष्टा, देवाचे वचन)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 योहान 05:13-15
- प्रेषितांची कृत्ये 13:28-29
- निर्गमन 32:15-16
- योहान 21:24-25
- लुक 03:4
- मार्क 09:11-13
- मत्तय 04:5-6
- प्रकटीकरण 01:1-3
Strong's
- Strong's: H3789, H7559, G1125