3.8 KiB
3.8 KiB
दहा आज्ञा
तथ्य:
"दहा आज्ञा" या जेंव्हा इस्राएल लोक कनान देशात जाण्याच्या मार्गावर असताना वाळवंटात राहत होते, तेंव्हा सिनाय पर्वतावर देवाने मोशेला आज्ञा दिल्या. देवाने या आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहिल्या.
- देवाने इस्राएल लोकांनी पाळण्यासाठी अनेक आज्ञा दिल्या, पण दहा आज्ञा या विशेष आज्ञा होत्या, ज्यांनी इस्राएली लोकांना देवावर प्रेम आणि त्याची उपासना आणि इतर लोकांवर प्रेम करण्यास मदत केले.
- या आज्ञा या देवाचा लोकांशी असलेल्या कराराचा एक भाग होत्या. देवाने ज्या अज्ञा दिल्या होत्या त्याप्रमाणे करून, इस्राएलाच्या लोकांनी देवाला दाखवून दिले की, ते देवावर प्रेम करतात आणि त्याचे आहेत.
- दगडी पाट्या ज्यावर दहा आज्ञा लिहिल्या होत्या, त्या कराराच्या कोशामध्ये ठेवल्या होत्या, जो सुरवातीला निवासमंडपाच्या अतिपवित्र स्थानात आणि नंतर मंदिरात स्थित होता.
(हे सुद्धा पहा: कराराचा कोश, आज्ञा, करार, वाळवंट, नियम, आज्ञा, सिनाय, उपासना)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 13:07 मग देवाने या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून मोशेकडे दिल्या.
- 13:13 जेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला व त्याने ती मूर्ती पाहिली, त्याला फार राग आला व ज्याच्यावर देवाने दहा आज्ञा लिहिल्या होत्या त्या दगडाच्या पाट्या त्याने तोडून टाकल्या.
- 13:15 मोशेने पुन्हा दहा आज्ञा लिहिण्यासाठी दगडाच्या दोन नविन पाट्यां बनवल्या कारण पहिल्या पाट्या त्याने फोडल्या ङोत्या.
Strong's
- Strong's: H1697, H6235