# दहा आज्ञा ## तथ्य: "दहा आज्ञा" या जेंव्हा इस्राएल लोक कनान देशात जाण्याच्या मार्गावर असताना वाळवंटात राहत होते, तेंव्हा सिनाय पर्वतावर देवाने मोशेला आज्ञा दिल्या. देवाने या आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहिल्या. * देवाने इस्राएल लोकांनी पाळण्यासाठी अनेक आज्ञा दिल्या, पण दहा आज्ञा या विशेष आज्ञा होत्या, ज्यांनी इस्राएली लोकांना देवावर प्रेम आणि त्याची उपासना आणि इतर लोकांवर प्रेम करण्यास मदत केले. * या आज्ञा या देवाचा लोकांशी असलेल्या कराराचा एक भाग होत्या. देवाने ज्या अज्ञा दिल्या होत्या त्याप्रमाणे करून, इस्राएलाच्या लोकांनी देवाला दाखवून दिले की, ते देवावर प्रेम करतात आणि त्याचे आहेत. * दगडी पाट्या ज्यावर दहा आज्ञा लिहिल्या होत्या, त्या कराराच्या कोशामध्ये ठेवल्या होत्या, जो सुरवातीला निवासमंडपाच्या अतिपवित्र स्थानात आणि नंतर मंदिरात स्थित होता. (हे सुद्धा पहा: [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [आज्ञा](../kt/command.md), [करार](../kt/covenant.md), [वाळवंट](../other/desert.md), [नियम](../kt/lawofmoses.md), [आज्ञा](../other/obey.md), [सिनाय](../names/sinai.md), [उपासना](../kt/worship.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [अनुवाद 04:13-14](rc://mr/tn/help/deu/04/13) * [अनुवाद 10:3-4](rc://mr/tn/help/deu/10/03) * [निर्गम 34:27-28](rc://mr/tn/help/exo/34/27) * [लुक 18:18-21](rc://mr/tn/help/luk/18/18) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[13:07](rc://mr/tn/help/obs/13/07)__ मग देवाने या __दहा आज्ञा__ दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून मोशेकडे दिल्या. * __[13:13](rc://mr/tn/help/obs/13/13)__ जेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला व त्याने ती मूर्ती पाहिली, त्याला फार राग आला व ज्याच्यावर देवाने __दहा आज्ञा__ लिहिल्या होत्या त्या दगडाच्या पाट्या त्याने तोडून टाकल्या. * __[13:15](rc://mr/tn/help/obs/13/15)__ मोशेने पुन्हा __दहा आज्ञा__ लिहिण्यासाठी दगडाच्या दोन नविन पाट्यां बनवल्या कारण पहिल्या पाट्या त्याने फोडल्या ङोत्या. # Strong's * Strong's: H1697, H6235