2.6 KiB
2.6 KiB
मध्यस्थ
व्याख्या:
एक मध्यस्थी हा असा मनुष्य आहे, जो दोन किंवा अधिक लोकांच्यामधील दुमत किंवा वादविवाद मिटवण्यास मदत करतो. तो त्यांच्यामध्ये समेत घडवून आणण्यास मदत करतो.
- लोकांनी पाप केल्यामुळे, ते देवाचे शत्रू झाले, जे त्याच्या क्रोधाचे आणि शिक्षेच्या पात्र होते. पाप केल्यामुळे, देव आणि त्याच्या लोकांच्यातील नातेसंबंध तुटले होते.
- येशू हा देव जो पिता आणि त्याचे लोक यांच्यामधील मध्यस्थी आहे, आणि तो लोकांच्या पापाची भरपाई म्हणून स्वतःचा प्राण देऊन तुटलेले नातेसंबंध पुनःस्थापित करत आहे.
भाषांतर सूचना:
- मध्यस्थी ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "व्यक्तींच्या मध्ये जाणे" किंवा "समेट घडवणारा" किंवा "शांती आणणारा मनुष्य" ह्यांचा समावेश होतो.
- या शब्दाची, "याजक" हा शब्द कसा भाषांतरित केला जातो ह्याच्याशी तुलना करा. जर "मध्यस्थी" हा शब्द वेगळ्या शब्दाने भाषांतरित केला तर हे सर्वोत्तम राहील.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 तीमथी 02:5-7
- गलतीकरांस पत्र 03:19-20
- इब्री लोकांस पत्र 08:6-7
- इब्री लोकांस पत्र 12:22-24
- लुक 12:13-15
Strong's
- Strong's: H3887, G3312, G3316