2.9 KiB
2.9 KiB
धूप
व्याख्या:
"धूप" या शब्दाचा संदर्भ सुगंधित मसाल्याच्या मिश्रनाशी आहे, ज्याला जाळून त्याचा दूर निर्माण केला जातो, ज्याचा सुगंधी वास असतो.
- देवाने इस्राएली लोकांना, त्याला अर्पण म्हणून धूप जाळण्यास सांगितले.
- देवाने निर्देशित केल्याप्रमाणेच पाच विशिष्ट मसाल्यांच्या समान मात्रा एकत्र करून धूप बनवावा लागत असे. हा एक पवित्र धूप होता, म्हणून त्याला इतर हेतूसाठी वापरण्याची परवानगी नव्हती.
- "धुपवेदी" ही एक विशेष वेदी होती, जिचा उपयोग फक्त धूप जाळण्यासाठी केला जात होता.
- धूप हे दिवसातून किमान चार वेळा, प्रार्थनेच्या प्रत्यक वेळी अर्पण करावे लागत होते. जेंव्हा जेंव्हा होमार्पण केले जात होते, तेंव्हा ह्याला सुद्धा प्रत्येक वेळी अर्पण करावे लागत होते.
- धुपाचे जाळणे हे प्रार्थना आणि उपासना ह्यांचे प्रतिक आहे, जे त्याच्या लोकापासून देवापर्यंत पोहोचते.
- "धूप" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "सुवासिक मसाले" किंवा "चांगल्या-वासाच्या वनस्पती" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पाहा: धूप जाळण्याची वेदी, होमार्पण, धूप)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2553, H3828, H4196, H4289, H5208, H6988, H6999, H7002, H7004, H7381, G2368, G2369, G2370, G2379, G3031