# धूप ## व्याख्या: "धूप" या शब्दाचा संदर्भ सुगंधित मसाल्याच्या मिश्रनाशी आहे, ज्याला जाळून त्याचा दूर निर्माण केला जातो, ज्याचा सुगंधी वास असतो. * देवाने इस्राएली लोकांना, त्याला अर्पण म्हणून धूप जाळण्यास सांगितले. * देवाने निर्देशित केल्याप्रमाणेच पाच विशिष्ट मसाल्यांच्या समान मात्रा एकत्र करून धूप बनवावा लागत असे. हा एक पवित्र धूप होता, म्हणून त्याला इतर हेतूसाठी वापरण्याची परवानगी नव्हती. * "धुपवेदी" ही एक विशेष वेदी होती, जिचा उपयोग फक्त धूप जाळण्यासाठी केला जात होता. * धूप हे दिवसातून किमान चार वेळा, प्रार्थनेच्या प्रत्यक वेळी अर्पण करावे लागत होते. जेंव्हा जेंव्हा होमार्पण केले जात होते, तेंव्हा ह्याला सुद्धा प्रत्येक वेळी अर्पण करावे लागत होते. * धुपाचे जाळणे हे प्रार्थना आणि उपासना ह्यांचे प्रतिक आहे, जे त्याच्या लोकापासून देवापर्यंत पोहोचते. * "धूप" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "सुवासिक मसाले" किंवा "चांगल्या-वासाच्या वनस्पती" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पाहा: [धूप जाळण्याची वेदी](../other/altarofincense.md), [होमार्पण](../other/burntoffering.md), [धूप](../other/frankincense.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 राजे 03:1-3](rc://mr/tn/help/1ki/03/01) * [2 इतिहास 13:10-11](rc://mr/tn/help/2ch/13/10) * [2 राजे 14:4-5](rc://mr/tn/help/2ki/14/04) * [निर्गम 25:3-7](rc://mr/tn/help/exo/25/03) * [लुक 01:8-10](rc://mr/tn/help/luk/01/08) # Strong's * Strong's: H2553, H3828, H4196, H4289, H5208, H6988, H6999, H7002, H7004, H7381, G2368, G2369, G2370, G2379, G3031