4.5 KiB
4.5 KiB
करूब, करुबीम
व्याख्या:
"करूब" आणि त्याचे अनेकवचन रूप "करुबीम" ह्यांचा संदर्भ एक विशिष्ठ प्रकारच्या स्वर्गीय अस्तित्वाशी आहे, ज्याला देवाने बनवले होते. पवित्र शास्त्रामध्ये करुबीमांना पंख आणि ज्वाला असल्याचे वर्णन केले आहे.
- करुबीम हे देवाचे वैभव आणि सामर्थ्य प्रदर्शित करतात, आणि ते पवित्र गोष्टींचे संरक्षक असे दिसत आहेत.
- आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्यानंतर, देवाने एदेन बागेच्या पश्चिम दिशेला करुबीम आणि ज्वालारूपी तलवार ठेवली, जेणेकरून मनुष्य जीवनाच्या झाडापर्यंत पोहचू शकणार नाही.
- देवाने इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, दोन करुबीम एकमेकांकडे तोंड करून असलेले, ज्यांच्या पंखांचा एकमेकांना स्पर्श होतील असे, कराराच्या कोशावर दयासानावर कोरा.
- त्याने त्यांना निवासमंडपाच्या पडद्यांवर करुबीमांचे चित्रदेखील विणण्यास सांगितले.
- काही परिच्छेदामध्ये, या प्राण्यांना चार चेहरे आहेत असेही वर्णन केले आहे: एक पुरुषाचा, एक सिंहाचा, एक बैलाचा आणि एक गरुडाचा.
- कधीकधी करुबीम हे देवदूत असल्याचा विचार केला जातो, पण पवित्र शास्त्र त्याबद्दल स्पष्टपणे सांगत नाही.
भाषांतर सूचना
- "करुबांवर" या शब्दाचे भाषांतर "पंख असलेले प्राणी" किंवा "पंख असलेले संरक्षक" किंवा "पंखांचे अध्यात्मिक संरक्षक" किंवा "पवित्र पंखांचे संरक्षक" असे केले जाऊ शकते.
- "करूब" ह्याचे भाषांतर करुबांवर ह्याच्या एकवचनी रुपात केले पाहिजे, उदाहरणार्थ, जसे की, या वाक्यात "पंख असलेला संरक्षक" किंवा "पंखांचा अध्यात्मिक संरक्षक."
- या शब्दाचे भाषांतर "देवदूत" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असायला हवे ह्याची खात्री करा.
- स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे
(हे सुद्धा पहा: देवदूत)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H3742, G5502