mr_tw/bible/other/tribute.md

25 lines
2.5 KiB
Markdown

# नजराणा (कर)
## व्याख्या:
"नजराणा" या शब्दाचा संदर्भ, एका राजाकडून दुसऱ्या राजासाठी, संरक्षणाच्या आणि त्यांच्या राष्ट्रांतील चांगल्या संबंधाच्या हेतूने, दिलेली भेट ह्याच्याशी येतो.
* एक नजराणा ही अशी देखील दिलेली रक्कम आहे, जी लोकांनी सरकारला देणे, जसे की, जकात किंवा कर या स्वरुपात, गरजेचे आहे.
* पवित्रे शास्त्राच्या काळात, प्रवासी राजा किंवा शासक काहीवेळा ज्या प्रांतातून तो जात आहे, त्या प्रांताच्या राजाला नजराणा देत असे, जेणेकरून प्रवासी राजा त्या प्रांतातून सुरक्षित किंवा सुखरूप जाऊ शकेल.
* बऱ्याचदा नजराण्यामध्ये पैश्याशिवाय अनेक गोष्टींचा समावेश होत असे, जसे की, अन्न, मसाले, उंची वस्त्रे, सोने यासारखे मौल्यवान धातू.
## भाषांतर सूचना:
* संदर्भाच्या आधारावर, "नजराणा" याचे भाषांतर "औपचारिक भेटवस्तू" किंवा "विशेष कर" किंवा "देय रक्कम" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [सोने](../other/gold.md), [राजा](../other/king.md), [शासक](../other/ruler.md), [कर](../other/tax.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 18:1-2](rc://*/tn/help/1ch/18/01)
* [2 इतिहास 09:22-24](rc://*/tn/help/2ch/09/22)
* [2 राजे 17:1-3](rc://*/tn/help/2ki/17/01)
* [लुक 23:1-2](rc://*/tn/help/luk/23/01)
* Strong's: H1093, H4060, H4061, H4371, H4503, H4522, H4530, H4853, H6066, H7862, G1323, G2778, G5411