3.2 KiB
3.2 KiB
राहाब
तथ्य:
जेंव्हा इस्राएलाने शहरावर हल्ला केला, तेंव्हा राहाब ही एक स्त्री होती, जी यरीहोमध्ये राहत होती. ती एक वेश्या होती.
- राहाब हिने इस्राएलाच्या दोन हेरांना लपवले होते, जे इस्राएल लोकांनी यरीहोवर हल्ला करण्यापूर्वी, त्या शहराची टेहळणी करण्यासाठी गेले होते. तिने त्या हेरांना परत सुखरूप इस्राएलाच्या तंबूत परतण्यासाठी मदत केली.
- राहाब यहोवावर विश्वास ठेवू लागली.
- जेंव्हा यरीहोचा पाडाव केला, तेंव्हा ती आणि तिचे कुटुंब वाचले गेले, आणि ते सर्वजन इस्राएलमध्ये राहण्यास आले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: इस्राएल, यरीहो, वेश्या)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
त्या शहरामध्ये रहाब नावाची एक वेश्या राहत होती. तिने त्या हेरांना आपल्या घरामध्ये लपवले व नंतर त्यांना निसटून जाण्यास मदत केली. तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता. जेव्हा इस्राएल लोक यरीहोचा नाश करतील तेव्हा रहाब व तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले.
-
देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला. त्यांनी केवळ राहाब व तिच्या कुटुंबास जिवंत ठेविले, जे नंतर इस्राएलांचा एक भाग बनले.
-
Strong's: H7343, G4460