mr_tw/bible/other/shame.md

3.0 KiB

लाज, मान खाली घालायला लावली, लज्जास्पद, लज्जास्पदरीतीने, निर्लज्ज, निर्लज्जपणे, शरम वाटणे

व्याख्या:

"लाज" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या व्यक्तीने किंवा इतर कोणत्या तरी व्यक्तीने केलेल्या लाजिरवाण्या किंवा अयोग्य गोष्टीमुळे अपमानित होण्याच्या वेदानात्मक भावनेशी येतो.

  • असे काहीतरी जे "लज्जास्पद" आहे, ते "अयोग्य" किंवा "लाजिरवाणे" आहे.
  • "शरम वाटणे" या शब्दाचे वर्णन, जेंव्हा एखादा व्यक्ती काहीतरी लज्जास्पद करतो, तेंव्हा त्याला कसे वाटते ही भावना आहे असे केले जाते.
  • "मान खाली घालायला लावली" या शब्दाचा अर्थ लोकांना हरवणे किंवा त्यांचे पाप उघड करणे, जेणेकरून त्यांना स्वतःची शरम वाटेल.
  • यशया संदेष्ट्याने सांगितले की, जे कोणी मूर्तीची उपासना करतील, त्यांना मान खाली घालायला लागेल.
  • देव एखाद्या मनुष्याला, जो पश्चात्ताप करीत नाही, त्याचे पाप उघड करून, मान खाली घालायला लावू शकतो, आणि त्याचा अपमान होण्यास कारणीभूत होऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, नम्र, अपमान, यशया, पश्चात्ताप, पाप, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H937, H954, H955, H1317, H1322, H2616, H2659, H2781, H3001, H3637, H3639, H3640, H6172, H7022, H7036, H8103, H8106, G127, G149, G152, G153, G422, G808, G818, G819, G821, G1788, G1791, G1870, G2617, G3856, G5195