mr_tw/bible/other/dream.md

35 lines
4.9 KiB
Markdown
Raw Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# स्वप्न
## व्याख्या:
एक स्वप्न हे असे काहीतरी आहे, जे लोक झोपेत असताना त्यांच्या मनात पाहतात किंवा अनुभव करतात.
* स्वप्ने पाहताना सहसा असे वाटते की, ती प्रत्यक्षात होत आहेत, पण तसे नसते.
* काहीवेळा देव लोकांना एखाद्याबद्दल स्वप्न देतो, म्हणजे ते त्यापासून काहीतरी शिकतील. कदाचित तो स्वप्नाद्वारे देखील लोकांशी थेट बोलू शकतो.
* पवित्र शास्त्रामध्ये, काही विशिष्ठ लोकांना देवाने विशेष स्वप्न देऊन त्यांना एक संदेश दिला, अनेकदा भविष्यात काय होईल हे सांगणारे स्वप्न.
* एक स्वप्न हे दर्शनापासून वेगळे आहे. जेंव्हा व्यक्ती झोपलेला असतो, तेंव्हा स्वप्न येतात, पण लोकांना दर्शन सहसा जागेपणी दिसतात.
(हे सुद्धा पहा: [दर्शन](../other/vision.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 02:16-17](rc://mr/tn/help/act/02/16)
* [दानीएल 01:17-18](rc://mr/tn/help/dan/01/17)
* [दानीएल 02:1-2](rc://mr/tn/help/dan/02/01)
* [उत्पत्ति 37:5-6](rc://mr/tn/help/gen/37/05)
* [उत्पत्ति 40:4-5](rc://mr/tn/help/gen/40/04)
* [मत्तय 02:13-15](rc://mr/tn/help/mat/02/13)
* [मत्तय 02:19-21](rc://mr/tn/help/mat/02/19)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[08:02](rc://mr/tn/help/obs/08/02)__ आपला पिता याकोब याचे योसेफावर जास्त प्रेम असल्यामुळे व योसेफ आपल्या भावांवर राज्य करील असे __स्वप्न__ त्याला पडल्यामूळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले.
* __[08:06](rc://mr/tn/help/obs/08/06)__ एके रात्री, फारोला, दोन चिंताजनक __स्वप्ने__ पडली. त्याच्या सल्लागारांपैकी कोणीही त्याला __स्वप्नांचा__ अर्थ सांगू शकला नाही.
* __[08:07](rc://mr/tn/help/obs/08/07)__ देवाने योसेफाला __स्वप्नांचा__ अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले. योसेफाने त्याच्या __स्वप्नांचा__ अर्थ सांगितला व म्हटले, "देव सात वर्षे पुष्कळ पिकपाणी देईल व त्यानंतर सात वर्षे दुष्काळ पडेल.
* __[16:11](rc://mr/tn/help/obs/16/11)__ म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला व आपणास पडलेले __स्वप्न__ एक मिद्यानी सैनिक आपल्या मित्रास सांगत असल्याचे गिदोनाने ऐकले. त्या सैनिकाचा मित्र म्हणाला, हया __स्वप्नाचा__ अर्थ गिदोनाचे सैन्य मिद्यानी सैन्यांचा पराभव करील असा होतो!
* __[23:01](rc://mr/tn/help/obs/23/01)__ तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बेअब्रु होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे तिला सोडण्याची योजना केली. त्याने असे करण्यापूर्वी, एक देवदूत त्याच्या __स्वप्नामध्ये__ आला व त्याच्याशी बोलला.
# Strong's
* Strong's: H1957, H2472, H2492, H2493, G1797, G1798, G3677