mr_tw/bible/other/bloodshed.md

32 lines
3.7 KiB
Markdown

# रक्त पाडणे (रक्त शिंपडणे/ओतणे, रक्तपात)
## व्याख्या:
"रक्त पडणे" या शब्दाचा संदर्भ, खून केल्यामुळे, किंवा युद्धामुळे, किंवा काही हिंसक कृत्यांमुळे झालेल्या मनुष्यांच्या मृत्यूशी आहे.
* या शब्दाचा शब्दशः अर्थ "रक्त वाहू देणे" असा आहे, हे जेंव्हा एखाद्या मनुष्याच्या शरीराच्या उघड्या जखमेतून रक्त येते त्याला सूचित करते.
* "रक्त पाडणे" या शब्दाचा उल्लेख सहसा लोकांच्या व्यापक प्रमाणावरील हत्येसाठी केला जातो.
* हे एखाद्या खुन्याच्या पापाचा सामान्य संदर्भ देण्यासाठी वापरले जाते.
## भाषांतर सूचना
* "रक्त पाडणे" ह्याचे भाषांतर "लोकांची हत्या करणे" किंवा "अनेक लोक मारले जाणे" असे देखील केले जाऊ शकते.
* "रक्त पडण्याद्वारे" ह्याचे भाषांतर "लोकांना मारून" असेही केले जाऊ शकते.
* "निर्दोष रक्त पाडणे" ह्याचे भाषांतर "निर्दोष लोकांची हत्या करणे" असे केले जाऊ शकते.
* "रक्तपातानंतर रक्तपात" ह्याचे भाषांतर "ते लोकांची हत्या करत राहिले" किंवा "लोकांची हत्या करणे सुरूच राहिले" किंवा "त्यांनी खूप लोकांची हत्या केली आहे आणि ते अजूनही करतच आहेत" किंवा "लोक इतर लोकांची हत्या करताच राहतात" असे केले जाऊ शकते.
* "रक्तपात तुझा पाठलाग करेल" या लाक्षणिक उपयोगाचे भाषांतर "तुझ्या लोकांत रक्तपात चालूच राहील" किंवा "तुझ्या लोकांची हत्या होत राहील" किंवा "तुझ्या लोकांची इतर राष्ट्रांशी आणि लोकांशी युद्ध सुरूच राहील आणि त्यात तुझे लोक मारत राहतील" असे देखील केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [रक्त](../kt/blood.md), [कत्तल](../other/slaughter.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 22:6-8](rc://mr/tn/help/1ch/22/06)
* [उत्पत्ति 09:5-7](rc://mr/tn/help/gen/09/05)
* [इब्री 09:21-22](rc://mr/tn/help/heb/09/21)
* [यशया 26:20-21](rc://mr/tn/help/isa/26/20)
* [मत्तय 23:29-31](rc://mr/tn/help/mat/23/29)
# Strong's
* Strong's: H1818, G2210