5.4 KiB
5.4 KiB
राजा, राजे राज्य, सत्ता, गादी (राज्य), राजपद
व्याख्या:
"राजा" या शब्दाचा संदर्भ एका मनुष्याशी आहे, जो एखाद्या शहराचा, राज्याचा किंवा देशाचा सर्वोच्च शासक आहे.
- एका राजाला सहसा शासन करण्यासाठी निवडले जात असे, कारण पूर्वीच्या राज्याशी त्याचे कौटुंबिक संबंध असत.
- जेंव्हा एक राजा मारत असे, तेंव्हा सहसा त्याचा सर्वात मोठा मुलगा त्याच्या जागी राजा बनत असे.
- प्राचीन काळी, राजाला त्याच्या राज्यातील लोकांवर निरपेक्ष अधिकार असायचा.
- क्वचितच "राजा" हा शब्द अशा कोणाला तरी संदर्भित करण्यासाठी वापरला जात असे, जो खरोखर राजा नाही, जसे की नवीन करारामध्ये "राजा हेरोद."
- पवित्र शास्त्रामध्ये, देवाला सहसा राजा म्हणून संदर्भित करण्यात आले आहे, जो त्याच्या लोकांवर शासन करतो.
- "देवाचे राज्य" ह्याचा संदर्भ त्याच्या लोकांवरील देवाच्या राज्याशी आहे.
- येशूला "यहुद्यांचा राजा," "इस्राएलाचा राजा," आणि "राजांचा राजा" असे संबोधण्यात आले आहे.
- जेंव्हा येशू परत येईल, तो जगावर राजा म्हणून राज्य करेल.
- या शब्दाचे भाषांतर "सर्वोच्च प्रमुख" किंवा "निरपेक्ष पुढारी" किंवा "सार्वभौम शासक" असे केले जाऊ शकते.
- "राजांचा राजा" या वाक्यांशाचे भाषांतर "राजा जो इतर सर्व राजांवर राज्य करतो" किंवा "सार्वभौम शासक, ज्याला इतर सर्व शासकांवर अधिकार आहे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः अधिकार, हेरोद अंतिपा, राज्य, देवाचे राज्य)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 तीमथ्य 06:15-16
- 2 राजे 05:17-19
- 2 शमुवेल 05:3-5
- प्रेषितांची कृत्ये 07:9-10
- प्रेषितांची कृत्ये 13:21-22
- योहान 01:49-51
- लुक 01:5-7
- लुक 22:24-25
- मत्तय 05:33-35
- मत्तय 14:8-9
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
08:06 एके रात्री, फारोला, दोन चिंताजनक स्वप्ने पडली.
-
16:01 इस्त्राएलांस राजा नव्हता, म्हणून प्रत्येक जण आपल्या दृष्टिने जे बरे ते तो करत असे.
-
16:18 शेवटी, लोकांनी इतर राष्ट्रांसारखा राजा देवाकडे मागितला.
-
17:05 शेवटी, शौल युद्धात मरण पावला आणि दाविद इस्त्रायलाचा राजा झाला. तो खूप चांगला राजा होता व लोक त्याजवर प्रेम करत.
-
21:06 देवाच्या संदेष्टयांनीही सांगितले होते की मसिहा हा एक संदेष्टा, याजक, आणि राजा असेल.
-
48:14 दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू हा संपुर्ण विश्वाचा राजा आहे!
-
Strong's: H4427, H4428, H4430, G935, G936