3.1 KiB
3.1 KiB
दहावा भाग, दशमांश, दशांश
व्याख्या:
"दहावा भाग" आणि "दशमांश" या शब्दांचा संदर्भ, एखाद्याचे पैसे, पिके, गुरेढोरे, किंवा इतर मालमत्ता ह्यांचा "दहा टक्के" किंवा "दहा भागातील एक भाग" जो देवाला दिला जातो, ह्याच्या संबंधात येतो.
- जुन्या करारामध्ये, देवाने इस्राएली लोकांना सूचना दिल्या की, त्यांनी त्यांच्या वास्तूतील दहावा भाग, हा देवाला आभार प्रदर्शनाचे अर्पण म्हणून देण्यासाठी बाजूला काढावा.
- या अर्पणाचा उपयोग इस्राएलाच्या लेवी गोत्राला आधार देण्यासाठी केला जात होता, जे इस्राएली लोकांची याजक म्हणून आणि निवासमंडपाचा, आणि नंतर मंदिराचासुद्धा काळजीवाहक म्हणून सेवा करत होते.
- नवीन करारामध्ये, देवाला दशांशची गरज नाही, पण त्याऐवजी त्याने विश्वासणाऱ्यांना उदारपणे आणि आनंदाने गरजू लोकांना मदत करण्याच्या आणि ख्रिस्ती सेवेच्या कामाला आधार देण्याच्या सूचना दिल्या.
- याचे भाषांतर "दहातील एक" किंवा "दहामधील एक" म्हणून देखील केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: विश्वास, इस्राएल, लेवी, गुरेढोरे, मलकीसदेक, सेवा करणारा, बलीदान, निवासमंडप, मंदिर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H4643, H6237, H6241, G586, G1181, G1183