mr_tw/bible/other/drinkoffering.md

26 lines
2.9 KiB
Markdown

# पेयार्पण
## व्याख्या:
"पेयार्पण" हे देवाला द्यायचे अशा प्रकारचे बलिदान होते, ज्यामध्ये वेदीवर द्राक्षरस ओतण्याचा समावेश होतो. हे अनेकदा होमार्पण आणि धान्यार्पण ह्यांच्याबरोबर अर्पण केले जात होते.
* पौल त्याच्या जीवनाचा संदर्भ, ते पेयार्पणासारखे ओतले जात आहे असा देतो. ह्याचा अर्थ त्याने स्वतःला देवाच्या सेवेसाठी आणि लोकांना येशुबद्दल सांगण्यासाठी संपूर्णपणे समर्पित केले होते, जरी त्याला हे माहित होते की त्यासाठी त्याला खूप त्रास आणि कदाचित मरण सुद्धा सोसावे लागेल.
* येशूचा वधस्तंभावरील मृत्यू हे अंतिम पेयार्पण होते, कारण आपल्या पापांसाठी वधस्तंभावर त्याचे रक्त ओतले गेले.
## भाषांतर सूचना
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "द्राक्षरसाचे अर्पण" यांचा समावेश असू शकतो.
* जेंव्हा पौल म्हणतो की, तो "एखाद्या अर्पणाप्रमाणे ओतला जात आहे" तेंव्हा त्याचे भाषांतर "देवाच्या वाचानांविषयी लोकांना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे, जसे द्राक्षरसाचे अर्पण वेदीवर पूर्णपणे ओतले जाते, त्याप्रमाणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [होमार्पण](../other/burntoffering.md), [धान्यार्पण](../other/grainoffering.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [निर्गम 25:28-30](rc://*/tn/help/exo/25/28)
* [यहेज्केल 45:16-17](rc://*/tn/help/ezk/45/16)
* [उत्पत्ति 35:14-15](rc://*/tn/help/gen/35/14)
* [यिर्मया 07:16-18](rc://*/tn/help/jer/07/16)
* [गणना 05:15](rc://*/tn/help/num/05/15)
* Strong's: H5257, H5261, H5262