mr_tw/bible/other/cupbearer.md

20 lines
2.1 KiB
Markdown

# पेला धरणारा, प्यालेबरदार
## व्याख्या:
जुन्या कराराच्या काळात, एक "प्यालेबरदार" हा राजाचा एक सेवक होता, ज्याचे राजाचा द्राक्षरसाचा प्याला आणण्याचे काम होते, सामान्यत: तो प्याला आणण्याच्या आधी द्राक्षरसामध्ये विष आहे की नाही हे चाखून बघून खात्री करण्याचे काम होते.
* या शब्दाचा शब्दशः अर्थ "पेला आणणारा" किंवा "असा एक जो पेला घेऊन येतो" असा होतो.
* एक प्यालेबरदार हा राजाचा अतंत्य विश्वासु आणि निष्ठावंत मनुष्य म्हणून ओळखला जायचा.
* त्याच्या विश्वासार्ह पदामुळे, शासकाने बनवलेल्या निर्णयांत एक प्यालेबरदाराचा बहुधा प्रभाव असायचा.
* काही इस्राएली लोक बाबेलामध्ये बंदिवासात असतानाच्या काळात, नहेम्या हा परसाचा राजा अर्तहशश्त याचा प्यालेबरदार होता.
(हे सुद्धा पहा: [अर्तहशश्त](../names/artaxerxes.md), [बाबेल](../names/babylon.md), [बंदी](../other/captive.md), [पारस](../names/persia.md), [फारो](../names/pharaoh.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 राजे 10:3-5](rc://*/tn/help/1ki/10/03)
* [नहेम्या 01:10-11](rc://*/tn/help/neh/01/10)
* Strong's: H8248