4.3 KiB
4.3 KiB
शुद्ध, शुध्द करणे, शुध्दीकरण
व्याख्या:
"शुद्ध" असणे म्हणजे दोष नसणे किंवा त्यात काहीही न मिसळणे. काहीतरी शुद्ध करणे म्हणजे ते स्वच्छ करणे आणि त्यास दूषित किंवा प्रदूषित करणारे काढून टाकणे
- जुन्या कराराच्या नियमासंदर्भात, "शुद्ध करणे" आणि "शुद्धीकरण" मुख्यत: एखाद्या वस्तुला किंवा व्यक्तीला विधीद्वारे अशुद्ध ठरविलेल्या त्या गोष्टींना स्वच्छ करणे याला संदर्भित करते जसे रोग, शरीरातील द्रव किंवा बाळंतपण.
- जुन्या करारामध्ये लोकांना पापांपासून शुद्ध कसे व्हावे हे सांगण्याचे नियम देखील होते, सहसा एखाद्या प्राण्याच्या बलिदानाने. हे फक्त तात्पुरते होते आणि यज्ञ पुन्हा पुन्हा करावे लागत असे.
- नवीन करारामध्ये, शुद्ध होणे म्हणजे बऱ्याचदा पापांपासून शुद्ध होते
- पापापासून पूर्णपणे आणि कायमचे शुद्ध होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येशू आणि त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवून पश्चात्ताप करणे आणि देवाची क्षमा प्राप्त करणे होय.
भाषांतर सूचना:
- "शुद्ध करणे" या शब्दाचे भाषांतर "शुद्ध बनवणे" किंवा "स्वच्छ करणे" किंवा "सर्व दूषितपणापासून साफ करणे" किंवा “सर्व पापांपासून मुक्त होणे" म्हणून केले जाऊ शकते
- "जेव्हा त्यांच्या शुध्दीकरणाची वेळ संपली" या वाक्यांशाचे भाषांतर "जेव्हा त्यांनी आवश्यक दिवसांची प्रतीक्षा करून स्वत: ला शुद्ध केले" असे केले जाऊ शकते
" पापांसाठी शुध्दीकरण प्रदान केले"या वाक्यांशाचे भाषांतर "लोकांना त्यांच्या पापांपासून पूर्णपणे शुद्ध करण्याचा मार्ग प्रदान केला" असे केले जाऊ शकते
- "शुद्धिकरण" या संज्ञचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "साफसफाई" किंवा "अध्यात्मिक धुणे" किंवा "विधीवत स्वच्छ होणे" या वाक्यांशाचा समावेश असू शकतो
(हे देखील पाहा: [प्रायश्चित्त], [स्वच्छ], [आत्मा])
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- [1 तीमथ्याला पत्र 01:05]
- [निर्गम 31: 6-9]
- [इब्री 09: 13-15]
- [याकोब 04:08]
- [लुक 02:22]
- [प्रकटीकरण 14:04]
शब्द संख्या:
- स्ट्रॉन्गचे: एच 1249, एच 1252, एच 1253, एच 1865, एच 2134, एच 2135, एच 2141, एच 2212, एच 2398, एच 2561, एच 289