3.3 KiB
3.3 KiB
वेदी, वेद्या
व्याख्या:
वेदी एक उभारलेली रचना होती ज्याच्या वर इस्राएल लोक देवाला प्राणी आणि धान्ये अर्पण करत.
- पवित्र शास्त्राच्या काळात, बऱ्याचदा साध्या सोप्या वेद्या मातीला दाबून मातीचा ढिगारा बनवून किंवा स्थिर ढिग तयार करण्यासाठी मोठ मोठे दगड एकमेकांवर ठेवून बनवल्या जात.
- सोने, पितळ किंवा कांस्य धातूने आच्छादलेल्या काही विशिष्ट पेटीच्या आकाराच्या वेद्या लाकडाने बनविल्या होत्या.
- इस्राएळ लोकांच्या जवळ राहणाऱ्या इतर लोकांच्या गटांनीही आपल्या दैवतांना बलिदान अर्पण करण्यासाठी वेद्या बांधल्या.
(हे सुद्धा पाहा: धूप जाळण्याची वेदी, खोट्या देवता, धान्य अर्पण, बलिदान)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- उत्पत्ति 08:20-22
- उत्पत्ति 22:9-10
- याकोबाचे पत्र 02:21-24
- लुक 11:49-51
- मत्तय 05:23-24
- मत्तय 23:18-19
पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:
- नोहा तारवाबाहेर आल्यानंतर,त्याने वेदी बांधली व अर्पणासाठी वापरल्या जाणा-या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातुन काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले.
- जेंव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी जेंव्हा पोहोचले तेंव्हा अब्राहामाने आपला पुत्र इसहाक यास बांधले व वेदीवर ठेविले.
- याजक त्या पशूस मारून त्याचे वेदीवर होमार्पण करत असे.
* मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळत्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर देवाला पशूबली अर्पण केला.
- Strong's: H741, H2025, H4056, H4196, G1041, G2379