# घोडेस्वार, स्वार # # # व्याख्या: ## पवित्र शास्त्रामध्ये, "स्वार" हा शब्द, युद्धामध्ये जे लोक घोडे चालवत त्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जायचा. * घोड्यांनी ओढलेल्या रथात बसलेल्या योद्ध्यांना सुद्धा "घोडेस्वार" म्हटले जाऊ शकते, परंतु हे पद सहसा घोड्यांवर स्वार होऊन गेलेल्या पुरुषांचा उल्लेख करते. * इस्राएली लोकांचा असा विश्वास होता की, युद्धामध्ये घोड्यांचा जास्त प्रमाणात वापर करणे म्हणजे देवापेक्षा स्वतःच्या सामर्थ्यावर जास्त भर देण्यासारखे आहे, म्हणून त्यांच्याकडे जास्त घोडेस्वार नव्हते. * या शब्दाचे भाषांतर "घोडे चालवणारे" किंवा "घोड्यावरील मनुष्य" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहाः [रथ](../other/chariot.md), [घोडा](../other/horse.md)) # # पवित्र शास्त्रातील संदर्भ: ## * [1 राजे 01:5-6](rc://mr/tn/help/1ki/01/05) * [दानीएल 11:40-41](rc://mr/tn/help/dan/11/40) * [निर्गम 14:23-25](rc://mr/tn/help/exo/14/23) * [उत्पत्ति 50:7-9](rc://mr/tn/help/gen/50/07) * Strong's: H6571, H7395, G2460