# बहुगुणीत, वाढत जाणे, वाढत गेले, बहुतपट, गुणाकार ## व्याख्या: "बहुगुणीत" या शब्दाचा अर्थ संख्येने मोठ्या प्रमाणात वाढत जाणे असा होतो. ह्याचा अर्थ, एखाद्या गोष्टीच्या प्रमाणात वाढ होणे, असाही होऊ शकतो, जसे की, वेदना बहुगुणीत होण्यास कारणीभूत होणे. * देवाने प्राण्यांना आणि मनुष्यांना "बहुगुणीत" होऊन पृथ्वी भरून टाकण्यास सांगितले. ही त्यांच्यासारखीच खूप जास्त अनेक असे उत्पादित करण्याची आज्ञा होती. * येशूने भाकरी आणि माश्यांना 5000 लोकांना खाऊ घालण्यासाठी बहुगुणीत केले. अन्नाचे प्रमाण वाढत राहिले, जेणेकरून प्रत्येकला खाऊ घालण्यासाठी गरजेपेक्षा जास्त शिल्लक असेल. * संदर्भाच्या आधारावर देखील, या शब्दाचे भाषांतर, "वाढणे" किंवा "वाढण्यास कारणीभूत होणे' किंवा "संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणे" किंवा "संख्येने जास्त होणे" किंवा "अधिक असंख्य होणे" असे केले जाऊ शकते. * "तुमच्या वेदना अधिक बहुगुणीत होतील" या वाक्यांशाचे भाषांतर, "तुमच्या वेदना अजून गंभीर होण्यास कारणीभूत होणे" किंवा "तुम्हाला अजून अधिक वेदनेचा अनुभव करण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते. * "घोडे बहुगुणीत करणे" ह्याचा अर्थ "लोभीपणाने जास्त घोडे मिळवत राहणे" किंवा "अधिक संख्येने घोडे मिळवणे" असा होतो. ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [अनुवाद 08:1-2](rc://mr/tn/help/deu/08/01) * [उत्पत्ति 09:5-7](rc://mr/tn/help/gen/09/05) * [उत्पत्ति 22:15-17](rc://mr/tn/help/gen/22/15) * [होशे 04:6-7](rc://mr/tn/help/hos/04/06) # Strong's * Strong's: H3254, H3527, H6280, H7231, H7233, H7235, H7680, G4052, G4129