# सोने, सोन्याचे ## व्याख्या: सोने हा एक पिवळा, उच्च दर्जाचा धातू आहे, जो दागदागिने आणि धार्मिक वस्तू बनविण्यासाठी वापरला जात होता. प्राचीन काळातील तो सर्वात मौल्यवान धातू होता. * पवित्र शास्त्राच्या काळात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुंना घन सोन्यातून बनवले गेले होते किंवा सोन्याच्या पातळ थराने झाकलेले होते. * या वस्तूंमध्ये कानातले आणि इतर दागदागिने, मुर्त्या, वेद्या आणि सभामंडप आणि मंदिरामध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तू, जसे की, कराराचा कोष ह्यांचा समावेश होता. * जुन्या कराराच्या काळात, सोने हे खरेदी आणि विक्रीच्या विनिमयाचे साधन होते. त्याची किंमत निश्चित करण्यासाठी ते वजनावर मोजले जात होते. * नंतर, सोने आणि इतर धातू जसे की, चांदी ह्यांचा उपयोग सिक्के बनवून ते खरेदी आणि विक्री करताना वापरण्यासाठी केला जात होता. * जेंव्हा, जे घन सोने नाही पण त्याला सोन्याचे एक पातळ आच्छादन आहे, अशा कशाचा तरी संदर्भ देताना, "सोनेरी" किंवा "सोन्याचे आच्छादन दिलेला" किंवा "सोन्याचा मुलामा दिलेला" असे शब्द वापरले जाऊ शकतात. * काहीवेळा एखाद्या वस्तूचे वर्णन "सोनेरी-रंगाचा" असे केलेले असते, ह्याचा अर्थ त्याला सोन्याचा पिवळा रंग लावलेला आहे, पण कदाचित ते सोन्यापासून बनवलेले नाही. (हे सुद्धा पहा: [वेदी](../kt/altar.md), [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [चांदी](../other/silver.md), [सभा मंडप](../kt/tabernacle.md), [मंदीर](../kt/temple.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 पेत्र 01:6-7](rc://mr/tn/help/1pe/01/06) * [1 तीमथ्य 02:8-10](rc://mr/tn/help/1ti/02/08) * [2 इतिहास 01:14-15](rc://mr/tn/help/2ch/01/14) * [प्रेषितांची कृत्ये 03:4-6](rc://mr/tn/help/act/03/04) * [दानीएल 02:31-33](rc://mr/tn/help/dan/02/31) # Strong's * Strong's: H1220, H1222, H1722, H2091, H2742, H3800, H4062, H5458, H6884, H6885, G5552, G5553, G5554, G5557