# पिढी ## व्याख्या: "पिढी" या शब्दाचा संदर्भ, लोकांच्या समूहाशी आहे, जे सगळे सुमारे एकाच काळात जन्माला आले होते. * एक पिढी देखील एका कालावधीचा संदर्भ देते. पवित्र शास्त्राच्या काळात, एक पिढी साधारणपणे सुमारे 40 वर्षांची मानली जाते. * पालक आणि त्यांची मुले ही दोन वेगवेगळ्या पिढीतील आहेत. * पवित्र शास्त्रामध्ये, "पिढी" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने सामान्यपणे सर्वसाधारण वैशिष्ठ्ये समाईक करणाऱ्या लोकांच्या संदर्भात वापरला जातो. ## भाषांतर सूचना "ही पिढी" किंवा "या पिढीचे लोक" या वाक्यांशाचे भाषांतर, "सध्या राहत असलेले लोक" किंवा "तुम्ही लोक" असे केले जाऊ शकते. * "ही दुष्ट पिढी" ह्याचे भाषांतर "सध्या राहत असलेले हे दुष्ट लोक" असे केले जाऊ शकते. * "पिढ्यानपिढ्या" किंवा "एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत" या अभिव्यक्तीचे भाषांतर "सध्या राहत असलेले लोक, त्याचबरोबर त्यांची मुले आणि नातवंडे" किंवा "प्रत्येक काळातील लोक" किंवा "या काळातील आणि पुढच्या काळातील लोक" किंवा "सर्व लोक आणि त्यांचे वंशज" असे केले जाऊ शकते. * "एक पिढी येईल जी त्याची सेवा करेल; ते त्यांच्या पुढच्या पिढीला यहोवाबद्दल सांगतील" याचे भाषांतर "भविष्यामध्ये अनेक लोक यहोवाची सेवा करतील आणि ते त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना त्याच्याबद्दल सांगतील" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [वंशज](../other/descendant.md), [दुष्ट](../kt/evil.md), [पूर्वज](../other/father.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 15:19-21](rc://mr/tn/help/act/15/19) * [निर्गम 03:13-15](rc://mr/tn/help/exo/03/13) * [उत्पत्ति 15:14-16](rc://mr/tn/help/gen/15/14) * [उत्पत्ति 17:7-8](rc://mr/tn/help/gen/17/07) * [मार्क 08:11-13](rc://mr/tn/help/mrk/08/11) * [मत्तय 11:16-17](rc://mr/tn/help/mat/11/16) * [मत्तय 23:34-36](rc://mr/tn/help/mat/23/34) * [मत्तय 24:34-35](rc://mr/tn/help/mat/24/34)