# धनुष्य आणि बाण ## व्याख्या: या प्रकारच्या शस्त्रामध्ये तारांच्या धनुष्याच्या सहाय्याने बाणांना फेकण्याचा समावेश होतो. पवित्र शास्त्राच्या काळात, ह्याचा उपयोग शत्रूंशी लढण्यासाठी आणि प्राण्यांना अन्नासाठी मारण्यासाठी केला जात होता. * धनुष्याला लाकूड, हाड, धातू किंवा इतर कठीण साहित्य, जसे की, हरणाचे शिंग ह्यापासून बनवले जात होते. ते वक्र आकाराचे असते आणि तारा, दोरी, किंवा वेलीने कसून बांधलेले असते. * बाण हा पातळ दांड्याचा तीक्ष्ण, आणि एका टोकाला टोकदार असतो. प्राचीन काळात, बाणांना वेगवेगळ्या साहित्यांचा उपयोग करून बनवले जात होते, जसे की, लाकूड, हाड, दगड किंवा धातू. * धनुष्य आणि बाणांना समान्यपणे शिकारी आणि योद्ध्यांच्या द्वारे वापरण्यात येत होते. * पवित्र शास्त्रामध्ये, "बाण" या शब्दाचा उपयोग काहीवेळा लाक्षणिक अर्थाने शत्रूंच्या हल्ल्यासाठी किंवा दैवी न्यायासाठी संदर्भित केला जातो. ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [उत्पत्ति 21:14-16](rc://mr/tn/help/gen/21/14) * [हबक्कूक 03:9-10](rc://mr/tn/help/hab/03/09) * [ईयोब 29:20-22](rc://mr/tn/help/job/29/20) * [विलापगीत 02:3-4](rc://mr/tn/help/lam/02/03) * [स्तोत्र 058:6-8](rc://mr/tn/help/psa/058/006) # Strong's * Strong's: H2671, H7198, G5115