# सभामंडप ## तथ्य: "सभामंडप" हा शब्द, एक तंबू जी एक तात्पुरती जागा होती, जिथे निवासमंडप बांधून होण्यापूर्वी परमेश्वर मोशेला भेटत असे, ह्याला संदर्भित करण्यासाठी केला आहे. * इस्राएल लोकांच्या छावणीच्या बाहेर सभामंडप तयार करण्यात आला होता. * जेंव्हा मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी सभामंडपात आत जात होता, तेंव्हा एक मेघस्तंभ, देवाची उपस्थिती तंबूत आहे हे दर्शविण्यासाठी तंबूच्या दाराजवळ उभा राहत असे. * इस्राएली लोकांनी निवासमंडप बांधल्यानंतर, तात्पुरत्या तंबूची गरज उरली नाही, आणि "सभामंडप" हा शब्द काहीवेळा निवासमंडपाला संदर्भित करण्यासाठी वापरला गेला. (हे सुद्धा पहा: [इस्राएल](../kt/israel.md), [स्तंभ](../names/moses.md), [निवासमंडप](../other/pillar.md), [तंबू](../kt/tabernacle.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 राजे 02:28-29](../other/tent.md) * [यहोशवा 19:51](rc://*/tn/help/1ki/02/28) * [लेवीय 01:1-2](rc://*/tn/help/jos/19/51) * [गणना 04:31-32](rc://*/tn/help/lev/01/01) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * देवाने इस्राएल लोकांना त्याच्यासाठी एक मंडप बनवण्यासाठी तपशीलवार माहिती दिली. ह्याला __निवासमंडप__ म्हणत, यामध्ये दोन खोल्या होत्या व त्यांना दुभागणारा एक मोठा पडदा होता. * देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण __निवासमंडपा__ समोर असणा-या वेदीवर देवाला होमार्पण करण्यासाठी पशू आणू शकत असे. * हे पाहून देव रागावला व __दर्शनमंडपाजवळ__ आला. * लोक __दर्शनमंडपासमोर__ उपासना न करता आता मंदिरामध्ये देवाची उपासना व अर्पण करु लागले. * Strong's: H168, H4150