# नेमून ठेवलेला, नेमलेला, विधिलिखित (नियती), पूर्वी नेमले होते ## व्याख्या: "विधिलिखित" या शब्दाचा संदर्भ लोकांच्या भविष्यात पुढे काय होईल ह्याच्याशी आहे. जर कोणालातरी काहीतरी करण्यासाठी "नेमलेले" असेल तर ह्याचा अर्थ तो व्यक्ती भविष्यामध्ये जे देवाने योजिले आहे ते करेल असा होतो. * जेंव्हा देव एखाद्या राष्ट्राला त्याच्या क्रोधासाठी "नेमून ठेवतो" तेंव्हा त्याचा अर्थ त्याने त्या राष्ट्राला त्यांच्या पापामुळे शिक्षा करण्याचे ठरविले किंवा निवडले आहे असा होतो. * यहुदाला नाशासाठी "नेमलेला" होता, ह्याचा अर्थ देवाने हे योजिले होते की, यहुदाचा नाश हा त्याने केलेल्या बंडखोरीमुळे होईल. * प्रत्येक व्यक्तीचे अंतिम, शाश्वत नशीब, एकतर स्वर्गात किंवा नरकातच असते. * जेंव्हा उपदेशकचा लेखक सांगतो की, प्रत्येकाची नियती सारखीच आहे, त्याचा अर्थ सर्व लोकांना अखेरीस मरावयाचे आहे असा होतो. ## भाषांतर सूचना * "तुला क्रोधासाठी नेमून ठेवलेला आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "तुला शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे" किंवा "तु माझ्या क्रोधाचा अनुभव घेशील हे निर्धारित केले आहे" असे केले जाऊ शकते. * "ते तलवारीसाठी नेमलेले आहेत" या लाक्षणिक अभिव्यक्तीचे भाषांतर "देवाने ठरविले आहे की, शत्रू त्यांचा नाश करील जो त्यांना तलवारींनी मारून टाकील" किंवा "देवाने हे निर्धारित केले आहे की, त्यांचा शत्रू त्यांना तलवारींनी मारून टाकील" असे केले जाऊ शकते. * "तुला च्या साठी नेमलेले आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाने तुला हे बनविण्याचे योजिले आहे" अशा वाक्यांशाने केले जाऊ शकते. * संदर्भावर आधारित, "विधिलिखित" ह्याचे भाषांतर "शेवटचा अंत" किंवा "शेवटी काय होईल" किंवा "देवाने योजील्याप्रमाणे होईल" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [बंदिवान](../other/captive.md), [सार्वकालिक](../kt/eternity.md), [स्वर्ग](../kt/heaven.md), [नरक](../kt/hell.md), [(बाप्तिस्मा करणारा) योहान](../names/johnthebaptist.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 05:8-11](../kt/repent.md) * [उपदेशक 02:13-14](rc://*/tn/help/1th/05/08) * [इब्री लोकांस पत्र 09:27-28](rc://*/tn/help/ecc/02/13) * [फिलीप्पेकरास पत्र 03:17-19](rc://*/tn/help/heb/09/27) * [स्त्रोत 009:17-18](rc://*/tn/help/php/03/17) * Strong's: H2506, H4150, H4487, H4745, H6256, H4507, G5056, G5087