# खात्री करणे (पाठींबा देणे, कायम करणे), खात्री केली, खात्री पटवणे ## व्याख्या: "खात्री करणे"आणि "खात्री" या शब्दांचा संदर्भ एखादी गोष्ट सत्य, किंवा निश्चित किंवा विश्वसनीय आहे असे संगण्याशी किंवा आश्वासन देण्याशी आहे. * जुन्या करारात, देव त्याच्या लोकांना सांगतो की, तो त्यांचाबारोबारचा त्याचा करार "कायम" करेल ह्याचा अर्थ तो असे म्हणत होता की, त्या करारामध्ये केलेली वचने तो पाळील. * जेंव्हा एखादा राजाची "खात्री केली" जाते, ह्याचा अर्थ त्याला राजा बनवण्याच्या निर्णयावर सर्व लोकांचे एकमत आणि सर्व लोकांचा पाठींबा आहे असा होतो. * एखाद्याने काय लिहिले ह्याची खात्री करणे, ह्याचा अर्थ जे काही लिहिले आहे ते सत्य आहे, हे सांगणे, असा होतो. * शुभवर्तमानाविषयी "खात्री" ह्याचा म्हणजे, लोकांना येशुबद्दलच्या शुभ वर्तेबद्दल अशा पद्धतीने शिकवणे की, ते दर्शवेल की ते सत्य आहे. * "खात्री पटवण्यासाठी" म्हणून शपथ देणे म्हणजे, एखादी गोष्ट सत्य किंवा विश्वासयोग्य आहे हे पटवून देण्याच्या इराद्याने सांगणे किंवा शपथ घेणे. * "खात्री करणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "सत्य आहे म्हणून सांगणे" किंवा "विश्वासयोग्य आहे असे साबित करणे" किंवा "सहमत असणे" किंवा "विश्वसनीय" किंवा "वचन देणे" असे संदर्भाच्या आधारवर केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [करार](../kt/covenant.md), [शपथ](../other/oath.md), [विश्वास](../kt/trust.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 इतिहास 16:15-18](rc://*/tn/help/1ch/16/15) * [2 करिंथकरांस पत्र 01:21-22](rc://*/tn/help/2co/01/21) * [2 राजे 23:3](rc://*/tn/help/2ki/23/03) * [इब्री 06:16-18](rc://*/tn/help/heb/06/16) * Strong's: H553, H559, H1396, H3045, H3559, H4390, H4672, H5414, H5975, H6213, H6965, G950, G951, G1991, G2964, G3315, G4300, G4972