जुन्या कराराच्या काळात, बैरशेबा हे शहर, यरुशलेमेच्या नैऋत्येस सुमारे 45 मैलावर एका वाळवंटी प्रदेशात, ज्याला आताच्या काळात नेगेव असे म्हणतात, तिथे वसलेले होते.
* बेरशेबाच्या आसपासचे वाळवंट हे माळरान होते जेथे अब्राहामाने आपल्या तंबूतून घालवून दिल्यावर हागार व इश्माएल भटकत राहिले.
* या शहराच्या नावाचा अर्थ "शपथेची विहीर" असा होतो. जेंव्हा अब्राहामाने, अबीमलेख राजाच्या मनुष्यांना त्याच्या हद्दीतील विहीर बंद करण्यासाठी शिक्षा न करण्याची शपथ घेतली तेंव्हा त्या जागेला हे नाव पडले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-names)
(हे सुद्धा पहा: [अबीमलेख](../names/abimelech.md), [अब्राहाम](../names/abraham.md), [हागार](../names/hagar.md), [इश्माएल](../names/ishmael.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md), [शपथ घेणे](../other/oath.md))