mr_tw/bible/other/stiffnecked.md

22 lines
3.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

# ताठ-मानेचा, हट्टी, ताठ मानेने (हट्टीपणाने), ताठर
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"ताठ-मानेचा" ही म्हण पवित्र शास्त्रामध्ये, अशा लोकांचे वर्णन्र करण्यासाठी वापरली जाते, जे सातत्याने देवाची आज्ञा मोडत राहतात, आणि पश्चात्ताप करण्यास नकार देतात. असे लोक खूपच गर्विष्ठ असतात, आणि ते देवाच्या अधिकारामध्ये स्वतःचे समर्पण करीत नाहीत.
* त्याचप्रमाणे, "हट्टी" हा शब्द अशा मनुष्याचे वर्णन करतो, जो त्याला आवाहन केले असताना सुद्धा, त्याचे विचार आणि कृती बदलण्यास नकार देतो. हट्टी लोक, इतर लोकांनी त्यांना दिलेले चांगले सल्ले किंवा सूचना ऐकत नाहीत.
* जुना करार, इस्राएली लोकांचे वर्णन "ताठ-मानेचे" म्हणून करतात, कारण देवाच्या संदेष्ट्यांनी त्यांना पश्चात्ताप करून यहोवाकडे परत वळण्याच्या वारंवार केलेल्या आव्हानाच्या संदेशाला ते ऐकत नाहीत.
* जर मान "ताठ" असेल तर ती सहजासहजी वाकली जाऊ शकत नाही. प्रकल्पित भाषेत कदाचित दुसरी म्हण असेल, जिचा अर्थ, एखादा व्यक्ती "हेकेखोर" असेल आणि त्याचे मार्ग बदलण्यास नकार देत असेल, असा होत असेल.
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "गर्विष्ठ्पणाने हट्टी" किंवा "अहंकारी आणि दुर्दम्य" किंवा "बदलण्यास नकार देणे" यांचा समावेश होतो.
(हे सुद्धा पहा: [अहंकारी](../other/arrogant.md), [गर्विष्ठ](../other/proud.md), [पश्चात्ताप](../kt/repent.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [प्रेषितांची कृत्ये 07:51-53](rc://*/tn/help/act/07/51)
* [अनुवाद 09:13-14](rc://*/tn/help/deu/09/13)
* [निर्गमन 13:14-16](rc://*/tn/help/exo/13/14)
* [यिर्मया 03:17-18](rc://*/tn/help/jer/03/17)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H47, H3513, H5637, H6203, H6484, H7185, H7186, H7190, H8307, G483, G4644, G4645