mr_tw/bible/names/elijah.md

38 lines
5.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

# एलीया
2018-08-14 03:00:16 +00:00
## तथ्य:
2018-08-14 03:00:16 +00:00
एलीया हा यहोवाचा सर्वात महत्त्वाचा संदेष्टा होता. इस्राएलाचे आणि यहूदाचे अनेक राजे राज्य करण्याच्या काळादरम्यान एलीयाने भविष्यवाणी केली, ज्यामध्ये अहाब राजाचा देखील समावेश आहे.
* देवाने एलीयाद्वारे अनके चमत्कार केले, ज्यामध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचा देखील समावेश आहे.
* एलीयाने अहाब राजाला बाल नावाच्या खोट्या देवाची उपासना करण्याबद्दल दोष लावला.
* त्याने बालच्या संदेष्ट्यांना एका परीक्षेत आव्हान दिले; त्याने हे सिद्ध झाले की यहोवा एकच खरा देव आहे.
* एलीयाच्या जीवनाच्या शेवटी, तो अद्याप जिवंत असतानाच देवाने त्याला अद्भूतरीत्या स्वर्गात नेले.
* शेकडो वर्षांनंतर, एलीया आणि मोशेसोबत येशू डोंगरावर दिसला आणि ते यरुशलेममध्ये येशूच्या येणाऱ्या दुःखाबद्दल आणि मृत्यूबद्दल एकत्र बोलले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names)
2018-08-14 03:00:16 +00:00
(हे सुद्धा पहा: [चमत्कार](../kt/miracle.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [यहोवा](../kt/yahweh.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 17:1](rc://*/tn/help/1ki/17/01)
* [2 राजे 01:3-4](rc://*/tn/help/2ki/01/03)
* [याकोबाचे पत्र 05:16-18](rc://*/tn/help/jas/05/16)
* [योहान 01:19-21](rc://*/tn/help/jhn/01/19)
* [योहान 01:24-25](rc://*/tn/help/jhn/01/24)
* [मार्क 09:4-6](rc://*/tn/help/mrk/09/04)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[19:02](rc://*/tn/help/obs/19/02)__ जेंव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. __अहाब__ हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.
* __[19:02](rc://*/tn/help/obs/19/02)__ __एलीया__ अहाबास म्हणला, ‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाही.
* __[19:03](rc://*/tn/help/obs/19/03)__ अहाब __एलीयास__ जिवे मारु इच्छित होता म्हणून देवाने एलीयास जंगलातील एका ओहोळाजवळ लपून राहाण्यास सांगितले. प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देवाने त्यास भोजन पुरविले.
* __[19:04](rc://*/tn/help/obs/19/04)__ परंतु त्यांनी __एलीयाची__ काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुप्पीतील तेल कधीच संपले नाही.
* __[19:05](rc://*/tn/help/obs/19/05)__ साडेतीन वर्षानंतर देवाने __एलीयास__ इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली.
* __[19:07](rc://*/tn/help/obs/19/07)__ मग __एलीया__ बाल देवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका."
* __[19:12](rc://*/tn/help/obs/19/12)__ तेंव्हा __एलीया__ त्यांस म्हणाला,‘‘बआलाच्या संदेष्टयांस पकडा; त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका!
* __[36:03](rc://*/tn/help/obs/36/03)__ तेंव्हा मोशे व __एलीया__ हे संदेष्टे त्यांच्या दृष्टीस पडले. ही माणसे शेकडो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मृत्युविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरुशलेममध्ये घडणार होते.
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H452, G2243